पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: 'यंदा पाक भारताविरुद्धचा खराब विक्रम मोडीत काढेल'

विराट कोहली आणि सरफराज अहमद

यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानी संघ चांगला खेळ दाखवत भारताविरुद्धची कामगिरी सुधारेल, अशी आशा पाकचा माजी कर्णधार इंइमाम उल हकने व्यक्त केली आहे. आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला भारता विरुद्धचा सामना कधीही जिंकता आलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात भारताने बाजी मारली आहे. 

World Cup : 'डोन्ट व्हरी... आम्ही कमबॅक करु'

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकात १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यात पाकिस्तान चांगली कामगिरी करेल, असा विश्वास इंझमामने व्यक्त केला आहे. पाकिस्तानमधील क्रिकेट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंजमामने आपल्या संघाच्या क्षमतेबद्दल भाष्य केले. यंदाच्या विश्वषचकात आमचा संघ भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरेल. विश्वचषकाचा अर्थ फक्त भारताविरुद्धचा सामन्यात चांगला खेळ करणे असा नाही. पाकिस्तानी संघात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे, असे इंझमामने म्हटले आहे. 

Video : यष्टिमागचा जादूगर धोनी जेव्हा सीमारेषेवर फिल्डिंग करतो

पाकिस्तानचा संघ सलग १० एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर विश्वचषकात खेळणार आहे. सराव सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती. याशिवाय विश्वचषकापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत यजमानांनी त्यांना ४-० ने पराभूत केले होते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup inzamam ul haq is hopeful that pakistan will end losing streak against india in icc odi world cup