पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvsENG: वकारचा टीम इंडियाला बाउन्सर

वकार युनिस

पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार यूनिसने भारताच्या विश्वचषकातील पहिल्या पराभवावर भाष्य केले आहे. इंग्लंड विरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात भारताला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील समीकरण अवघड झाले आहे.

वकार युनिसने ट्विटच्या माध्यमातून भारताच्या पहिल्या पराभवावर खंत व्यक्त केली. "तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही जीवनात कसे वावरता यावरुन तुमची ओळख समजते. मला पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचते का नाही याची चिंता नाही. पण काही चॅम्पियन खेळाचा आदर राखू शकले नाहीत." अशा शब्दांत वकारने टीम इंडियाला बाउन्सर लगावला आहे.  

भगव्या जर्सीचा पराभव हिरव्या जर्सीला झोंबणारा!

यापूर्वी पाकचे माजी क्रिकेटर बासित अली आणि सिकंदर बक्ख यांनी पाकिस्तानला बाहेर काढण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मुद्दाम काही सामन्यात पराभूत होईल, असा तर्क लावला होता. भारताविरुद्धच्या विजयानंतर इंग्लंडच्या नावे १० गुण झाले असून त्यांचा न्यूझीलंड विरुद्ध एक सामना बाकी आहे. पाकिस्तान गुणतालिकेत ९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ते बांगलादेशविरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहेत.

ICC WC, #INDvENG : साहेबांसमोर भारतीय संघ दुय्यमच!

काही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वकारला प्रत्युत्तरही दिले आहे. पाकिस्तानला स्पर्धेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. हे मान्य करा, उगाच काहीही तर्क लढवू नका, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc world cup india vs england icc world cup 2019 ind vs eng waqar younis tweet for on this match