पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#ICC WC : कर्णधार कोहलीची धोनीसाठी बॅटिंग

महेंद्रसिंह धोनी

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताला विश्वचषकातील पहिला पराभव स्वीकारावा लागला. यजमानांकडून ३१ धावांनी पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या धीम्या खेळीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. सामन्यानंतर धोनीच्या संथ खेळीवर कर्णधार विराटला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी कर्णधाराने धोनीची पुन्हा एकदा पाठराखण केली.   

#INDvsENG: वकारचा टीम इंडियाला बाउन्सर

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोहीलीने फलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. मात्र यावेळी त्याने धोनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगत धोनीची पाठराखण केली. कोहली म्हणाला की, धोनी चेंडू सीमापार धाडण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होता. पण चेंडू म्हणावा त्या गतीने बॅटवर येत नव्हता. पडल्यानंतर चेंडू धीम्या गतीने येत असल्याने अखेरला फलंदाजी करणे अवघड होते. आम्ही चूका सुधारुन पुढच्या सामन्यासाठी मैदानात उतरु, असेही त्याने सांगितले.  

#INDvENG भारताच्या पराभवामागची पाच कारणे

भारताविरुद्धचा सामना जिंकत इंग्लंडने उपांत्य फेरीच्या प्रवेशासाठीच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आहे. प्रतिस्पर्धी संघ चागंला खेळ दाखवला असे सांगताना कोहली म्हणाला की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आम्हाला जिंकण्याची संधी होती. पण आम्ही चुकीच्या ठिकाणी विकेट टाकल्या. सातत्याने गडी बाद होत राहिल्याने आमच्या हातून सामना निसटला.