पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेटकऱ्यांनी डोकं ठिकाण्यावर आणल्यावर पाक चाहत्याचा माफीनामा

सरफराज अहमद

पाकिस्तानचा कर्णधार सरफराजला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पाक चाहत्याचे डोके अखेर ठिकाण्यावर आले आहे. नेटकऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रियांचा भडीमार केल्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने माफी मागितली आहे. मी स्वत: पाकिस्तानी आहे. ही गोष्ट एवढी मोठी होईल वाटले नव्हते. व्हिडोओ अनावधानाने अपलोड झाला असल्याचा उल्लेख करत चाहत्याने सरफराजची माफी मागितली आहे.   

इंग्लंडमधील रहिवासी असलेल्या एका पाक चाहत्याने मुलासोबत मॉलमध्ये आलेल्या सरफराजला फिटनेसवरुन डिवचत आक्षेपार्ह शब्दांत त्याची खिल्ली उडवली होती.  'भाई, आप सुअर जैसे मोटे क्यों होते जा रहे हो।' असा प्रश्न त्याने केला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
एखाद्या संघाच्या कर्णधाराचा अशा प्रकारे अपमान करणे चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया संबंधित व्हिडिओवर उमटल्या होत्या. त्यानंतर पाक चाहत्याला सुबुद्धी सुचली आणि त्याने सरफराजची माफी मागितली. 

Video : पाक चाहत्याने सरफराजला चारचौघात 'बेअब्रू' केलं

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पराभवानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमे आणि पाक क्रिकेट समर्थकांनी संघ आणि कर्णधाराला चांगलीच टीका केली होती. मात्र या चाहत्याने खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या कृतीवर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत चाहत्यालाच फैलावर घेतले होते.