पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : #INDvSA सलामीच्या सामन्यात चहलचा कहर

युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट्स पटकावल्या

विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलने भारताच्या फिरकीतील ताकद दाखवून दिली. बुमराहच्या भेदक माऱ्याने गांगरुन गेलेल्या आफ्रिकन फलंदाजांना चहलने चांगलेच नाचवले. आपल्या १० षटकांचा कोटापूर्ण करताना त्याने  आफ्रिकेच्या चार तगड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

#INDvSA बुमराहच्या कॉलिटीवर नो डाउट, पण एकदा हे आकडे बघाच!

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसीस संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. चहल त्याला फारसी संधी देत नव्हता. धावांच्या शोधात असलेल्या ड्युप्लेसीसला  चहलच्या एका षटकात रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. अन् तो चहलच्या फिरकीत अडकला. दुसऱ्या बाजूला २२ धावांवर खेळणाऱ्या दुसेनला चहलने कधी दांडी उडवले ते कळलं देखील नाही. 

#INDvSA Live : तळाच्या फलंदाजांनी तारलं, भारतासमोर २२८ धावांचे 

त्यानंतर मैदानात उतरलेल्या डेव्हिड मिलर एक आश्वासक इनिंग खेळत असल्याचे दिसत असताना कोहलीने पुन्हा चहलच्या हाती चेंडू सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत चहलने स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत मिलरला चालते केले. चहलला फटकेबाजी करण्याच्या नादात फेहलुकवायोने आपली विकेट गमावली. त्याला धोनीने यष्टिचित केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात चहलने १० षटकात ५१ धावा खर्च करत सर्वाधिक चार बळी मिळवले. यात वाइडच्या रुपात त्याने तीन अवांतर धावा दिल्या. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Yuzvendra Chahal bamboozles Du Plessis der Dussen Andile Phehlukwayo and David Miller Watch Video