पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी विराट दुखापतीनं त्रस्त

भारतीय संघाचे फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फारहार्ट आणि विराट कोहली

विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची धाकधूक वाढली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सरावादरम्यान जखमी झाला आहे. साऊथहॅम्प्टन येथील मैदानात नेटमध्ये सराव करत असताना विराटच्या हाताच्या उजव्या बोटाला दुखापत झाली. विराटची ही दुखापत भारतीय संघ व्यवस्थापन आणि भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांची धाकधूक वाढवणारी आहे.     

ICC WC 2019: न्यूझीलंडची श्रीलंकेवर १० विकेट्सनी मात

सरावादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर विराट कोहली भारतीय संघाचे फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फारहार्ट यांच्याकडून उपचार करुन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विराटला झालेली दुखापत ही क्षेत्ररक्षण करताना झाली आहे की फलंदाजी करताना हे समजू शकले नाही. बीसीसीआयने यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र सराव संपल्यानंतर विराट बर्फाचा शेक घेत असताना नर्वस दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव भारतीय संघासोबतच त्याच्या चाहत्यांची चिंता वाढवणारे होते. दुखापतीतून सावरण्यासाठी विराटकडे बुधवारपर्यंत वेळ आहे.

ICC WC 2019 : पाकच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

त्यामुळे ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो खेळण्याची आस कायम आहे. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलँडकडून पराभूत व्हावे लागले होते. पण त्यानंतर बांगलादेशविरुद्ध संघाने चांगले कमबॅक करुन स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Worry for India as captain Virat Kohli picks up injury ahead of 1st match against South Africa