पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विश्वचषकात भारतीय संघ डोळ्यासमोर ठेवून लढू: सरफराज

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यातील नियोजित क्रिकेट सामना खेळवला जाणार का? हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानच्या संघ नायकाला भारतीय संघ डोळ्यासमोर ठेवून खेळल्यास पाकला दुसरा विश्वचषक मिळू शकतो, असे वाटत आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने विश्वचषकातील प्रत्येक सामना हा भारताविरुद्ध खेळत आहोत, याच इराद्याने मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे. आयसीसी चॅम्पियन्स चषकात आम्ही भारतीय संघाला पराभूत केले आहे. याचा आम्हाला फायदा होईल, असेही तो म्हणाला. विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी लाहोरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरफराज बोलत होता.

साखळी फेरीतील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक सामना आम्ही भारताविरुद्ध खेळत आहोत, याच उद्देशाने खेळू असे तो म्हणाला आहे. पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेट आणि पाकिस्तान संघ स्पर्धेसाठी उत्सुक आहे. सध्याचा संघ उत्तम क्षमता असणारा असून संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. आपण जर विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील इतिहास पाहिला तर आतापर्यंत एकाही विश्वचषकात (मर्यादित षटक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धा) भारतीय संघाने पाकिस्तानला जिंकण्याची संधी दिलेली नाही. ३० मे पासून यजमान इंग्लंज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या लढतीने इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या यंदाच्या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यात १९९२ चा विश्वजेता ठरलेला पाकिस्तान संघ ३१ मे ला वेस्ट इंडिजविरुद्ध आपला स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. तर १६ जून २०१९ ला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नियोजित आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Will Treat Every Game As a Match Against India Says Pakistan Captain Sarfraz