पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvsNZ: दबाव झेलेल तो फायनल खेळेल, कोहलीचा 'स्टेट ड्राइव्ह'

विराट कोहली

मँचेस्टरच्या मैदानात जो संघ दबावात चांगला खेळ दाखवले तो अंतिम सामन्यात प्रवेश करेल, असे थेट मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने मांडले. उपांत्य सामन्यापूर्वी कोहली पत्रकार परिषदेत बोलत होता. कोहली म्हणाला की, साखळी सामन्यात संघावर फारसा दबाव नसतो. पण बाद फेरीत दबावात खेळावे लागते. या परिस्थितीत तुम्हाला चांगला खेळ दाखवण्याचे आव्हान असते. 

न्यूझीलंडचा संघ मागील विश्वचषकात फायनलपर्यंत पोहचला होता. त्यामुळे दोन्ही संघ अनुभवी आहेत. जो संघ दबावात चांगला खेळ दाखवेल, त्याला फायनलचे तिकीट मिळेल, असे कोहली यावेळी म्हणाला. उपांत्य सामन्यापूर्वी संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये आत्मविश्वास दिसत आहे. आतापर्यंत चांगला खेळ दाखवत आम्ही इथेपर्यंत पोहचलो आहोत. अशीच कामगिरी दाखवण्यास उत्सुक आहोत.

#INDvsNZ: वर्ल्ड चॅम्पियनसाठी या पाच गोष्टींवर चिंतन करावेच लागेल

यावेळी कोहलीने सलामीवीर रोहित शर्माचेही कौतुक केले. पुढील दोन सामन्यात तो शतकी खेळी करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलेले, असे सांगत उपांत्यफेरीत आम्ही न्यूझीलंडला शह देऊ असा विश्वास कोहलीने व्यक्त केला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Whoever handles pressure better will come out on to Kohli ahead of semi against NZ