पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : कुलदीपनं पाकच्या सेट जोडीला गंडवलं

विराट कोहली आणि कुलदीप यादव

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रेफर्डच्या मैदानात सुरु असलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या विकेटनंतर बाबर आझम आणि फखर झमान यांनी १०४ धावांची भागीदारी रचत तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना थोडे चिंतेत निश्चितच पाडले होते. पण ही जोडी फोडत कुलदीपने या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.

लयीत असलेल्या बाबर आझमला कुलदीपनं अप्रतिम चेंडूवर चकवा दिला. आपल्या अर्धशतकापासून दोन धावा दूर असताना कुलदीपचा चेंडू त्याला कळायच्या आत त्रिफळा उडवून गेला. त्यानंतर कुलदीपनं अर्धशतकी खेळी करणाऱ्या फखर झमानला चहलकरवी झेलबाद केले. जोडीदार तंबूत परतल्यानंतर स्विप खेळण्याचा प्रयत्न करताना फखर झमान कुलदीपच्या जाळ्यात अडकला.    

कुलदीपने दोन विकेट्स मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या संघाची विकेट गळतीच सुरु झाली. परिणामी सामन्यावर भारताची पकड अधिक मजबूत झाली. कुलदीपने आपल्या ९ षटकात ३२ धावा खर्च करुन दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केले. सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

ICC WC 2019 : पाक विरुद्ध रो'हिट' शर्माचे विक्रमी शतक