पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC World Cup: पाक गोलंदाजाचा प्रशिक्षकालाच बाउन्सर

वहाब रियाझ

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वहाब रियाझने आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रशिक्षकांनाच बाउन्सर मारला आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकात चांगली कामगिरी करुन प्रशिक्षकांना चुकीचे ठरवून दाखवणार असे म्हटले आहे.  २०१७ मध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत वहाब पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता.

ICC World Cup: विराट ब्रिगेड लंडनमध्ये दाखल, असा आहे वार्मअप प्लॅन

आगामी विश्वचषकासाठी अखेरच्या क्षणी त्याची संघात वर्णी लागली.  मागील वर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी वहाबच्या स्वभावावरुन त्याच्यावर टिका केली होती. वहाबने दोन वर्षात एकाही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात योगदान दिलेले नाही, असे ते म्हणाले होते.    

भारतीय क्रिकेट संघातही PUBG प्रेमी मंडळ

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, वहाबने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी पत्रकारपरिषदेत म्हटले आहे की, "मी माझ दु:ख शब्दात व्यक्त करु शकत नाही. परंतु मी भूतकाळात राहणार नाही. ती गोष्ट आता इतिहास जमा झाली आहे.  आम्ही विश्वचषकात कशी कामगिरी करतो हे महत्त्वाचे ठरेल. प्रशिक्षकाचे काम खेळाडूंकडून चांगली काम करुन घेण्याचे असते. ते विजयाच्या दृष्टिने संघ बाधणी करत असतात. मी देखील संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो. दोन वर्षानंतर मला संधी मिळाली आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करुन मी त्यांना चुकीचे ठरवेन"