पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#IndvsPak : विराटची विकेट ही पाकचं 'फादर्स डे' चं गिफ्ट

विराट कोहली ( फोटो सौजन्य ट्विटर)

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डच्या मैदानात भारताने पाकिस्तानसमोर ३३७ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पावसाच्या  व्यत्ययानंतर पुन्हा मैदानात आलेला कोहली भारताच्या डावाच्या ४८ व्या षटकात ७७ धावांवर बाद झाला. आमिरचा उसळी घेणारा चेंडू बॅटची कड घेऊन सरफराजच्या हातामध्ये विसावला. अन् कोहलीने मैदान सोडले. 

#IndvsPak : रनमशीन कोहलीची विश्व विक्रमाला गवसणी

पण, अल्टाएजमध्ये कोहलीच्या बॅटचा आणि आमिरने टाकलेल्या त्या चेंडूचा संपर्क झाले नसल्याचे लक्षात आले. रिप्लायमध्ये कोहली बाद नव्हता हे स्पष्ट दिसले. त्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये बुमराहने डोक्याला हात लावल्याचे पाहायला मिळाले. रिव्ह्यू घेतला असता तर कोहली मैदानात थांबला असता, हे त्याच्या लक्षात आले. याशिवाय कोहलीनेही रिप्लाय पाहून हताश झाल्याचे पाहायला मिळाले. 

ICC WC 2019 : पाक विरुद्ध रो'हिट' शर्माचे विक्रमी शतक

सोशल मीडियावर विराटच्या विकेटची चर्चा सुरु झाली आहे. एका नेटकऱ्याने विराट बाद नव्हता असे सांगत भारताने फादर्स डेचं गिफ्ट म्हणून पाकिस्तानला मुफ्तमध्ये विराटची विकेट दिल्याचे म्हटले आहे. या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Virat Kohli walked but ultra edge showed no spike he wasnt out nothing much just a gift from the father on fathers day