पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किंग कोहलीने उलगडले वैवाहिक जीवनातील रहस्य

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानातील तुफान खेळीसोबतच बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत असलेले प्रेम प्रकरण आणि तिच्यासोबत केलेल्या विवाहामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. ११ डिसेंबर २०१७ मध्ये विराट आपली खास मैत्रीण आणि प्रेयसी अनुष्कासोबत इटलीमध्ये पारंपारिक पद्धतीने विवाहबद्ध झाला होता. याच पार्श्वभूमीवर त्याला विवाहानंतर नेतृत्वामध्ये काही सकारात्मक बदल झाले का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

विराटच्या क्लिन बोल्डवर भारत-पाक चाहत्यांमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

यावर विराटने वैवाहिक जीवनानंतर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले. विराट म्हणाला की "विवाहानंतर तुम्ही अधिक जबाबदार होता. वैवाहिक जीवन जगत असताना तुमची जबाबदारी खूप वेगळी असते. तुम्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास सुरुवात करता. प्रत्येक गोष्टीबद्दल एक वेगळा दृष्टिकोन निर्माण होण्यास सुरुवात होते. विवाहानंतर मी खूप अधिक जबाबदार झालो आहे. याचा मला संघाचे नेतृत्व करताना देखील फायदा होतो. नेतृत्वासोबतच एक माणूस म्हणूनही माझ्यात खूप सुधारणा झाली आहे."    

Most Sixes Record In WC : षटकारांच्या आतषबाजीच्या विक्रमावर एक नजर

न्यूझीलँडविरुद्धच्या सराव सामन्यातील अपयशानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या विश्वचषकातील लढतीपूर्वी कोहलीला सूर गवसणे भारतीय संघासाठी निश्चितच फायदेशीर आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Virat Kohli reveals effect of marriage with Anushka Sharma on captaincy