पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ : आमच्या खेळाकडे सकारात्मकतेनं पाहा : कोहली

विराट कोहली

क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघाच्या खेळाकडे सकारात्मकतेनं पाहावे, असे मत विराट कोहलीने उपांत्य सामन्यातील पराभवानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. भारतामध्ये खेळाची संस्कृती अधिक जागृत करण्यासाठी याची गरज आहे, असेही तो म्हणाला. 

पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांमधून टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात, यासंदर्भात विराट कोहलीला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर विराट म्हणाला की, क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे संतुलन असणे गरजेचे आहे अगदी तसेच क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रियांमध्येही संतूलन असायला हवे. पराभवानंतर निराशा येणे स्वाभाविक आहे, पण टोकाची भूमिका घेणे योग्य नाही, असे मला वाटते. विजय आणि पराभव दोन्ही प्रसंगी चाहत्यांनी समतोल राखायला हवे, असे तो म्हणाला.

#INDvNZ: निकाल निराशजनक!. पण टीम इंडिया शेवटपर्यंत लढली: PM मोदी

सामन्यातील पराभव हा आघाडीला आलेलं अपयश असल्याचे त्याने सांगितले. भारताच्या डावाच्या ४० ते ४५ मिनिटात प्रतिस्पर्धी न्यूझीलंडने आम्हाला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या विकेट्स गमावल्यानंतर कमबॅक करणे कठिण होते. जडेजाचे कौतुक करताना कोहली म्हणाला की, जड्डूचा खेळ मी गेल्या दहा वर्षांपासून पाहत आहे. त्याच्यात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्याने आम्हाला सामन्यात आणले होते. पण तो बाद झाल्यानंतर आमच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. न्यूझीलंड दबावात चांगला खेळ दाखवणारा संघ आहे. त्यांनी चांगला खेळ दाखवला, असेही कोहली म्हणाला.    

#INDvNZ : भारत आउट! न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंत किंवा हार्दिक ऐवजी धोनीला बढती का दिली नाही? असा प्रश्नही विराटला करण्यात आला होता. यावर कोहली म्हणाला, पंतने चांगला खेळ दाखवला. अनुभवानुसार तो आणखी परिपक्व होईल. परिस्थितीनुसार धोनीने फलंदाजी करावी हे अपेक्षित होते. त्याप्रमाणे त्याला फलंदाजीला पाठवण्यात आले. जडेजा एका बाजूने आक्रमक खेळ करत असताना धोनीने परिस्थितीनुसार खेळ केला, असेही कोहली यावेळी म्हणाला.    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 virat kohli press conference after New Zealand beat India to enter final