पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#IndvsPak : रनमशीन कोहलीची विश्व विक्रमाला गवसणी

विराट कोहली

भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विक्रमी खेळी करुन परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावे नोंदवला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ५७ धावा करताच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.  
कोहलीने २२२ डावांमध्ये ही कामगिरी केली असून विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने २७६ डावात हा पल्ला गाठला होता.  क्रिकेट कारकिर्दीतील ११ वर्षांहून कमी कालावधीत असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला फलंदाज आहे. यापूर्वी भारताकडून सचिनशिवाय सौरव गांगुलीने ११ हजारी पार केली होती. 

वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्धची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा कमी पार करणाऱ्यांच्या यादीत कोहली इतर फलंदाजांच्या तुलनेत अव्वलस्थानी आहे. त्याच्याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर (२७६), रिकी पॉन्टिंग (२८६), सौरव गांगुली (२८८), जॅक कॅलिस (२९३) आणि कुमारा संगकाराने ३१८ डावात ११ हजारींचा टप्पा पार केला होता.

ICC WC 2019 : पाक विरुद्ध रो'हिट' शर्माचे विक्रमी शतक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 virat kohli cross 11 thousand runs mark in odi cricket breaks sachin tendulkar record