पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुखापतीने घेतली टीम इंडियाची दुसरी विकेट, विजय शंकर स्पर्धेतून बाद

विजय शंकर

विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीला सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात भारताचा अष्टपैलू विजय शंकरही स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मयांक अगरवालला संघात स्थान मिळणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

बुमराहच्या यॉर्करवर विजय शंकर घायाळ, भारताला आणखी एक धक्का

सरावादरम्यान जसप्रीत बुमराहचा एका यॉर्कर चेंडूवर विजय शंकरच्या पायला दुखापत झाली होती. त्यानंतर तो अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरला. या दोन्ही सामन्यात त्याने फक्त फलंदाजीच केल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळेच त्याने गोलंदाजी केली नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे.  

विजय शंकरच्या दुखापतीवर बुमराहने दिली रिअ‍ॅक्शन

विजय शंकरच्या जागी कर्नाटकचा सलामीवीर मयंक अगरवालला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मयंक अगरवालने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मात्र त्याने आतापर्यंत भारताकडून एकदिवसीय सामना खेळलेला नाही. वर्ल्ड कपमधून तो वनडेमध्ये पदार्पण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठेरले.