पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुमराहच्या यॉर्करवर विजय शंकर घायाळ, भारताला आणखी एक धक्का

जसप्रीत बुमराह आणि विजय शंकर

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ एका बाजूला दमदार कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूने दुखापतीचा माऱ्याने संघाच्या अडचणी वाढत आहेत. सलामीवीर शिखर धवनने दुखापतीनंतर स्पर्धेला मुकावे लागल्यानंतर भुवनेवर कुमार दोन सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त धडकले. त्यात आता आणखी एका वृत्ताची भर पडली आहे. 

ICC WC 2019 : बीसीसीआयचा रिव्ह्यू फेल! धवन 'आउट' पंत 'इन'

भारतीय संघातील अष्टपैलू विजय शंकरला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे समोर येत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, नेट प्रॅक्टिसवेळी जसप्रीत बुमराहचा यॉर्कर चेंडू विजय शंकरच्या पायला लागला आहे. भारतीय संघातील सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, नेट प्रॅक्टिस दरम्यान बुमराहच्या गोलंदाजीवर विजय शंकरला झालेली दुखापतही गंभीर नाही. 

ICC World Cup 2019 : शमीच्या खांद्यावर भुवीचे ओझे!

विजय शंकर हा भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाचा उत्तम पर्याय आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवली नसली तरी गोलंदाजीत त्याने कमालीची कामगिरी दाखवली होती. या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघाला पहिले यश त्यानेच मिळवून दिले होते.