पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताविरुद्धचा पराभव आमच्यासाठी टर्निंग पाइंट ठरला : मिचेल स्टार्क

मिचेल स्टार्क

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्यात आली आहे. गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियन संघ यंदाच्या स्पर्धेत सर्वात प्रथम उपांत्यफेरी गाठणारा संघ ठरला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत त्यांनी आपल्या खात्यात आणखी दोन गुणांची भर घातली. भारतीय संघासोबतच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय ठरला. 

या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल मार्शलने भारतीय संघातील पराभवातून खूप काही शिकायला मिळाल्याचे म्हटले आहे. भारतीय संघासोबतचा पराभव आमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला, असा उल्लेखही यावेळी त्याने केला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८६ धावांनी पराभूत करत गुणतालिकेतील आपले अव्वलस्थान आणखी भक्कम केले. भारताविरुद्धच्या पराभवानंतरच्या प्रत्येक सामन्यात आम्ही सातत्यपूर्ण विकेट घेण्यात यश मिळवले. आक्रमक होण्यापेक्षा नियोजनबद्ध खेळ केला. भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर आमचा खेळात अधिक सुधारणा झाली, असे स्टार्क म्हणाला. 

 

Video : रविंद्र जडेजाचा 'लाजवाब' झेल

यंदाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ८ पैकी ७ सामने जिंकले असून भारताविरुद्धच्या एकमेव सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनच्या शतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत केले होते.