पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बोल्ट म्हणतो, धोनी-जडेजानं आमची चिंता वाढवली होती, पण...

बोल्टने रविंद्र जडेजाला बाद करत भारताला मोठा धक्काद दिला होता.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आघाडी कोलमडल्यानंतर पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला धोनी-जड्डू जोडीनं आशेचं एक किरण दाखवलं. धोनी-जडेजाच्या खेळीनं भारताच्या ताफ्यात उत्साह दिसत असताना न्यूझीलंड गोलंदाजांना धडकी भरली होती. किवींचा प्रमुख गोलंदाज असणाऱ्या ट्रेंट बोल्टने धोनी-जडेजाने आमची चिंता वाढवली होती. धोनी-जडेजा यांच्या भागीदारीने सामना दोघांसाठी खुला झाला होता, असे त्याने म्हटले आहे.

#ENGvAUS, Video: संघाची काळजी, रक्तबंबाळ होउनही कॅरी भारी खेळला

बोल्ट म्हणाला की, धोनी आणि जडेजाने आम्हाला दबावात टाकले होते. सामन्यात काहीही होऊ शकते असे वाटत होते. पण आम्ही सामना आमच्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरलो. नव्या चेंडूवर स्विंग चांगला मिळत होता. याचा आम्ही फायदा करुन घेण्यात यशस्वी ठरलो. आम्ही चांगली गोलंदाजी करुन कोणत्याही संघासमोर अडचणी निर्माण करु शकतो, हा विश्वास घेऊनच मैदानात उतरलो होतो. लॉर्डसच्या मैदानात याच इराद्याने उतरणार असल्याचे बोल्टने म्हटले आहे.  

...तर सचिन-रोहितचा विक्रम मागे टाकणे वॉर्नरला जमणार नाही

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आघाडी कोलमडल्यानंतर पंत आणि पांड्याच्या अल्प भागीदारीला जोड देत धोनी-जडेजाने आश्वासक खेळी केली. ही जोड गोळी भारताला सामना जिंकून देण्याय यशस्वी ठरेल, असे वाटत असताना बोल्टने जडेजाला बाद केले. त्यानंतर अखेरच्या षटकात गप्टिलने धोनीला धावबाद करत भारताच्या आशा संपुष्टात आणल्या. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 trent boult admits that mahendra singh dhoni and ravindra jadeja scared new zealand team in icc cricket world cup 2019 semifinals