पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : या तीन समस्या भारतीय संघाची डोकेदुखी वाढवू शकतात

या समस्या भारतीय संघाची डोकेदुखी वाढवू शकतात.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करत आहे. भारतीय संघ स्पर्धेतील प्रबळ दावेदारापैकी एक मानला जात आहे. सध्याच्या घडीला संघात समतोल दिसत असला तरी मैदानातील संघाची कामगिरीच त्यांचा पुढील प्रवास निश्चित करेल. भारतीय संघाला पुढील तीन समस्या डोकेदुखी ठरु शकतात. यावर विराट कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

सलामी जोडीची चिंता ...

भारतीय संघाच्या सातत्यपूर्ण यशात रोहित शर्मा-शिखर धवन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहालीच्या मैदानात रंगलेल्या एकदिवसीय सामन्यात या जोडीने दमदार कामगिरी केली होती. सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट सलामीची जोडी म्हणून या जोडगोळीकडे पाहिले जाते. पण मोहालीचा सामना वगळता ऑस्ट्रेलियाविरुद्ध या जोडीला फारशी चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. सराव सामन्यातही ही जोडी फारशी चाललेली नाही. त्यामुळे सलामीची जोडी लयीत येणं भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण असेल.  

 

ICC WC 2019: भारत-श्रीलंका-पाकला जमलं नाही ते बांगलादेशनं करुन दाखवलं

अनुभवी भुवनेश्वरला पुन्हा आपल्यातील आत्मविश्वास दाखवावा लागेल

सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह भारताच्या गोलंदाजी ताफ्यातील प्रमुख अस्त्र आहे. त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळणे आवश्यक आहे. भारताचा अनुभवी आणि भरवशाचा गोलंदाज भुवनेश्वरला ही जागा भरुन काढावी लागेल. पाठीच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलेला भुवीमध्ये पहिल्यासारखा आत्मविश्वास दिसत नाही. २०१८ पासून त्याला बऱ्याचदा संघाबाहेर रहावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीनं चांगली कामगिरी करत  त्याच्या पुढे निघून गेला. त्यामुळेच सध्याच्या घडीला बुमराहला साथ देणारा गोलंदाज म्हणून त्यालाच पसंती मिळते. पण स्विंगला साथ देणाऱ्या इंग्लंडच्या खेळपट्टीवर भुवनेश्वर अधिक फायदेशीर ठरु शकतो. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास परतणे भारतीय संघासाठी हितकाही ठरेल.  

Video : विराट ब्रिगेडसाठी सारा अलीचा खास संदेश 

केदार जाधवचा फिटनेस

आयपीएलच्या मैदानातील दुखापतीनंतर केदार जाधव १५ सदस्यीय संघासोबत इंग्लंडला रवाना झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. केदार जाधव फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये उपयुक्त कामगिरी करुन दाखवण्यात सक्षम आहे. पण फिटनेस ही त्याची मोठी समस्या राहिली आहे. यंदाच्या विश्वचषकात त्याच्या फिटनेसच्या समस्यन पुन्हा डोकेवर काढलं तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 three concerns for team india ahead of their opening against south africa