पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC World Cup 2019 : भारतीय संघ जाहीर; रायडू, पंत संघाबाहेर

विश्वकरंडक स्पर्धा २०१९

येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे संघामध्ये अंबाती रायडू आणि ऋषभ पंत यांना संधी देण्यात आलेली नाही. विजय शंकर आणि केदार जाधव यांना संघामध्ये संधी देण्यात आली आहे. एकूण १५ सदस्यांच्या संघाची सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने घोषणा केली. 

कोण आहेत १५ क्रिकेटपटू

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
केएल राहूल
विजय शंकर
महेंद्रसिंह धोनी
केदार जाधव
दिनेश कार्तिक
युजवेंद्र चहल
कुलदीप यादव
भुवनेश्वर कुमार
हार्दिक पांड्या
रविंद्र जडेजा
जसप्रीत बुमराह
मोहम्मद शमी

यंदाचा विश्वकरंडक इंग्लंडमध्ये होत असून, विशेष म्हणजे १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वकरंडक इंग्लंडमध्येच जिंकला होता. टीम इंडियाने २०११ मध्ये दुसऱ्यांदा भारतातच विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. यंदाच्या संघामध्ये दिनेश कार्तिक याची दुसरा विकेटकिपर म्हणून निवड करण्यात आली आहे.