पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत फायनलमध्ये नसल्यानं स्टार स्पोर्ट्सला कोट्यवधींचा फटका

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषकातील प्रवास सेमीफायनमध्येच संपुष्टात आला. न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पराभवाने देश-विदेशातील कोट्यवधी नागरिकांचा हिरमोड झाला. भारतीय संघ फायनलला मुकल्याने स्टार स्पोर्ट्स वाहिनीला जवळपास कोट्यवधीचा आर्थिक फटका बसला. भारतीय संघ स्पर्धेतून बाद झाल्यामुळे त्यांना जवळपास १० ते १५ कोटींचा फटका बसला आहे.  

CWC 2019 Final: इंग्लंड-न्यूझीलंडदरम्यान इतिहास रचण्यासाठी 

जाहिरातदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉर्डसच्या मैदानात आज भारतीय संघ मैदानात असता तर जाहिरातीचे दर सर्वाधिक असते. भारताच्या फायनलमधील सामन्यासाठी प्रति सेकंद २५ ते ३० लाखांची जाहिरात मिळाली सहज मिळाली असती. मात्र इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात १५ ते १५ लाख इतका दर सुरु आहे.

#ENGvNZ Live: क्रिकेटच्या पंढरीत 'नवा गडी नवं राज्य'साठी लढत  

प्रसारमाध्यम सल्लागार हर्षा जोशी म्हणाले की, स्टार स्पोर्ट्स विविध प्रकारातून जाहिरात स्वीकारत असते. मात्र, भारतीय संघ फायनलमध्ये नसल्याने अखेरच्या क्षणाला मिळणाऱ्या जाहिरातीवर परिणाम झाला आहे.