पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'करुणरत्न'! यंदाच्या वर्ल्ड कपमधील नर्व्हस नाइंटीचा दुसरा बळी!

दिमुथ करुणारत्ने

किंगस्टन ओव्हलच्या मैदानात सुरु असलेल्या विश्वचषकातील २० व्या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेला शतकाने अवघ्या तीन धावांनी हुलकावणी दिली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या ३३४ धावांचा पाठलाग करताना कुरुणारत्नेने दमदार फलंदाजी करत संघाच्या डावाला आकार दिला. मात्र शतकाच्या जवळ असताना केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने त्याचा झेल घेतला. करुनारत्नेनं १०८ चेंडूत ९७ धावांची खेळी केली. यात ९ चौकारांचा समावेश होता. 

ICC WC 2019 : कर्णधार फिंचसह ऑसीची विक्रमी सेंच्युरी

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत नव्वदीच्या घरात बाद होणारा कुरुणारत्ने हा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू नॅथन कुल्टर नील ९२ धावांवर बाद झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नीलचे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले होते. नव्वदीच्या घरात बाद होणे कोणत्याही फलंदाजासाठी निराशजनक असा अनुभव असतो.

ICC WC 2019 : 'सुपर संडे' कोण गाजवणार! भारत, पाक की पाऊस...?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर दिमुथ करुणारत्ने बाद झाल्यानंतर श्रीलंका बॅकफूटवर गेले. त्याच्याव्यतिरिक्त या सामन्यात सलामीवीर कुशल परेराने अवघ्या ३६ चेंडूत ५२ धावांची आक्रमक खेळी केली. या दोघांशिवाय अन्य कोणताही फलंदाज नावाला साजेसा खेळ करु शकला नाही. मध्यफळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे श्रीलंका पराभवाची भीती आणखी गडद झाली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Sri Lanka vs Australia Match 20 Srilankan Captain Karunaratne Nervous nineties falls for 97 in word cup record