पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : स्टार्क-फिंचचा डंका, श्रीलंकेच्या पदरी निराशा

ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला नमवले

किंगस्टन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या विश्वचषकातील २० व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ८७ धावांनी पराभूत केले.  कर्णधार फिंचच्या १५३ धावांची झंजावत खेळी आणि स्टार्कचा भेदक मारा याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना एकहाती जिंकला. प्रथम फलंदाजी करताना फिंचने केलेल्या शतकी खेळीनंतर स्टिव्ह स्मिथने संघाच्या धावसंख्येत ७३ धावांची भर घातली. तर ग्लेन मॅक्सवेलने २५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४६ धावांची आक्रमक खेळी केली.

फलंदाजांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात ७ बाद ३३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २४७ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार तर रिचर्डसनने तीन बळी टिपले. पॅट कंमिन्सने दोन आणि जेसन बेहरनडॉर्फने एक बळी मिळवला.  

'करुणरत्न'! यंदाच्या वर्ल्ड कपमधील नर्व्हस नाइंटीचा दुसरा बळी!

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सलामीच्या जोडीने ११५ धावांची भागीदारी केली. स्टार्कने कुशेल परेराला बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर मैदानात उतरलेला एल. थिरिमाने १६ धावांची भर घालून बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर बाद झाला. कुशेल मेंडिसने मैदानात तग धरण्याचा प्रयत्न केला. पण ३० धावांवर खेळत असताना स्टार्कने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. धनंजया डी सिल्वाने नाबाद १६ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी श्रीलंकेचा डाव ४५.५ षटकात २४७ धावांत गुंडळला. दिड शतकी खेळी करणाऱ्या फिंचला सामनावीरचा पुरस्कार बहाल करण्यात आला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.

ICC WC 2019 : कर्णधार फिंचसह ऑसीची विक्रमी सेंच्युरी