पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : भारताच्या विजयामागची पाच कारणे

भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी

रोहित शर्माच्या नाबाद संयमी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. साऊथहॅम्प्टनच्या द रोझ बाऊलच्या मैदानात रंगलेल्या विश्वचषकातील आठव्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ६ गडी राखून पराभूत केले. भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी साजेसा खेळ केला नसला तरी सलामीला आलेला रोहित शेवटपर्यंत मैदानात नाबाद राहिल्याने भारतीय संघाला स्पर्धेतील प्रबळ दावेदार का? म्हटले जाते याची झलक मिळाली. भारताच्या विजयात जितका वाटा रोहित शर्माचा आहे तितकाच प्रभाव खालील पाच घटकांचाही आहे.    

ICC WC 2019 : रोहितनं चोकर्संना रडवलं, आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव

  • खराब सुरुवातीनंतर रोहितनं सावरलं

भारतीय संघाची सलामीची जोडी ही सध्याच्या घडीला सर्वोत्कृष्ट मानली जाते. पण गेल्या काही सामन्यात या जोडीकडून साजेसा खेळ होत नाही. आजच्या सामन्यात धवन लवकर बाद झाला. पण रोहित शेवटपर्यंत लढल्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग सहज सोपा झाला.  

  • चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी

भारतीय संघाला स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर फलंदाजीत केवळ विराटवर अवलंबून राहून चालणार नाही. तर चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाने त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे गरजेचे आहे. या सामन्यात अगदी असेच चित्र पाहायला मिळाले. भरवशाचा फलंदाज आणि कर्णधार विराट केवळ १८ धावांवर परतल्यानंर लोकेश राहुलने रोहितला उत्तम साथ दिली. त्याने मोठी धावसंख्या उभारली नसली तरी रोहितसोबत त्याने केलेली ८५ धावांची भागीदारीमुळे  लवकर बाद झाला तर संघावरील दबाव वाढ  

  • आफ्रिकेचे गचाळ क्षेत्ररक्षण

भारतीय डावाच्या दुसऱ्याच षटकात दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने रोहित शर्माला गोंधळात पाडले होते. रोहितला बाद करण्याची एक संधी त्यांना मिळाली. पण संघ ज्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जायचा तो रुबाब त्यांनी दाखवलाच नाही. परिणामी त्यांच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.  

  • आफ्रिकेच्या आघाडीच्या फंलदाजांवर भारतीय गोलंदाज पडले भारी 

भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांना हात खोलण्याची कोणतीच संधी दिली नाही. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये कर्णधार फाफ ड्युप्लेसीसच्या ३८ धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याव्यतिरिक्त अन्य खेळाडू सपशेल अपयशी ठरले. आघाडीच्या एका फलंदाजाने जर अर्धशतकापर्यंत मजल मारली असती तर त्यांची संधी वाढली असती. 

  • आफ्रिकेच्या फिरकीचे अपयश 

भारताच्या फिरकीपटूंनी आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला. यात युजवेंद्र चहलच्या चार आणि कुलदीपला मिळालेल्या एका विकेटचा समावेश आहे. याउलट दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांच्या पदरी निराशाच आली. रबाडा दोन आणि मॉरीस आणि फेहलुकावायोने प्रत्येकी एक- एक विकेट घेत भारताच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण शाम्सी आणि इमरान ताहिरला त्यांना साथ द्यायला जमले नाही. या दोघांना एकही विकेट मिळाली नाही. 

ICC WC 2019, #INDvSA हिटमॅनची संयमी शतकपूर्ती