पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019, #INDvSA : रोहितनं चोकर्संना रडवलं, आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव

रोहित शर्मा

रोहित शर्माने आघाडीच्या फलंदाजांच्या साथीने  छोटी-छोटी भागीदारी रचत केलेल्या संयमी शतकाच्या जोरावर सलामीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ६ गडी राखून पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या १३ धावा असताना रबाडाने शिखर धवनला ८ धावांवर चालते केले. त्यानंतर रोहितने कोहलीसोबत डावाला आकार देण्यास सुरुवात केली. त्याने कर्णधारासोबत ४१ धावांची भागीदारी केली.  भारतीय संघाला विराट कोहलीच्या रुपात दुसरा धक्का बसला. फेहलुकवायोने विराच्या रुपात विश्वचषकातील आपला पहिला बळी मिळवला. कोहलीने ३४ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने १८ धावांचे योगदान दिले. 

कोहली परतल्यानंतर रोहितने लोकेश राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. यात लोकेश राहुलने ४२ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर धोनीसोबत रोहितने ७४ धावांची भागीदारी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. धोनीच्या जागी आलेल्या पांड्याने चौकार खेचत भारताच्या सलामीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहित शर्मा १४४ चेंडूत १२२ धावा करुन नाबाद राहिला. यात १३ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 

दक्षिण आफ्रिकेच्या तळाचा फलंदाज क्रिस मॉरिस (४२) आणि रबाडा *(३१) यांनी केलेल्या दमदार खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. साऊथहॅम्प्टनच्या द रोझ बाऊलच्या मैदानात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी निर्धारित ५० षटकात संघाची धावसंख्या ९ बाद २२७ पर्यंत पोहचवली.  

#INDvSA बुमराहच्या कॉलिटीवर नो डाउट, पण एकदा हे आकडे बघाच!

तत्पूर्वी बुमराहने सुरुवातीलाच दोन धक्के देत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर टाकले. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर धोनीने क्विंटन डी कॉकला झेल बाद करण्याची संधी गमावली. याच षटकात दुसऱ्या चेंडूवर स्टाइकला आलेल्या हाशिम आमलाला बुमराहने रोहितकरवी झेलबाद करत आफ्रिकाला पहिला धक्का दिला. आमलाने ९ चेंडूत ६ धावा केला. त्यानंतरच्या षटकात बुमहाने १० धावांवर खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला तंबूचा रस्ता दाखवला. 

सलामीची जोडी स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कर्णधार फाफ ड्युप्लेसीस आणि दुसेन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चहलसमोर ही जोडीचा निभाव लागला नाही. चहलच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करण्याच्या नादात दुसेनने २२ धावांवर आपली विकेट टाकली. तो बाद झाल्यानंतर कर्णधार फाफ ड्युप्लेसिस चकवा देत चहलने त्याला क्लीन बोल्ड करत आफ्रिकेला चौथा धक्का दिला. ड्युप्लेसिसने ५४ चेंडूत ३८ धावा केल्या. आघाडी बारगळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची परिस्थिती बिकट झाली. कुलदीप यादवने जेपी ड्युमीनीला ३ धावांवर माघारी धाडत आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. 

वर्ल्ड कपसह मनंही जिंका, मोदींचा विराट ब्रिगेडला संदेश

 अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर  मिलर (३१) आणि फेहलुकायो (३४) या जोडीनं धावफलक हलता ठेवला. या दोघांची खेळीला चहलने लगाम लावला. ही जोडी परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दोनशेचाही टप्पा गाठणार नाही असे वाटत होते. मात्र, क्रिस मॉरिसने ३१ चेंडूत १ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने केलेली ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी आणि रबाडाने ३५ चेंडूत केलेल्या नाबाद ३१ धावांच्या जोरावर आफ्रिकेला २२७ धावांपर्यंत मजल मारता आली. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 South Africa vs India Match 8 Live Cricket Score Commentary Virat Kohli Faf du Plessis