दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आपला जलवा दाखवू शकला नाही. रबाडाने त्याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. सुरुवातीपासूनच रबाडाने भारतीय सलामीच्या जोडीवर दबाव बनवण्यास सुरुवात केली होती. भारताच्या डावात दुसरे षटक घेऊन आलेल्या रबाडाच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत धवनने रोहितला स्ट्राइक दिले. या षटकात रोहितला जीवनदानही मिळाले.
Rohit breaks his bat! 😂Rabada is too quick #SAvsIND pic.twitter.com/5sDmL6LYJg
— WillS (@WillS28290255) June 5, 2019
#INDvSA बुमराहच्या कॉलिटीवर नो डाउट, पण एकदा हे आकडे बघाच!
भारतीय डावातील चौथ्या षटकातही त्याने आपला मारा कायम ठेवला. या षटकात त्याने शेवटचा चेंडू तब्बल १४६ kph एवढ्या गतीने टाकला. या भेदक माऱ्याने धवनच्या बॅटचा टवका उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतरच्या पुढच्या षटकात म्हणजे भारताच्या डावाच्या सहाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रबाडाने धवनला यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले.
एका नेटकऱ्याने रबाडाच्या जलदगती चेंडूवर गब्बरच्या बॅटचा टवका उडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.