पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: बांगलादेशनं आफ्रिकेला पराभूत करुन दाखवलं

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश

विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत करत स्पर्धेमध्ये उलटफेर करण्याचे   संकेत दिले आहेत. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित ५० षटकात ३३० धावांचा डोंगर उभारुन दक्षिण आफ्रिकेसमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला ८ बाद ३०९ धावांपर्यंत मजल मारता आली. 

बांगलादेशने दिलेल्या ३३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला क्विंटन डी कॉकच्या स्वरुपात पहिला धक्का बसला. रहिमने त्याला २३ धावांवर धावबाद केले. त्यानंतर एडन मार्करम  आश्वासक खेळी करत डाव सावरण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना शाकिबने त्याला ४५ धावांवर क्लिन बोल्ड केले. कर्णधार फाफ ड्युप्लेसीसने साजेसा खेळ दाखवत संघाकडून सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. मात्र मेहंदी हसनने त्याला बाद करुन आफ्रिकेला अडचणीत आणले. दुसेन-जेपी ड्युमीनी यांनी अनुक्रमे (४१) आणि (४५) धावा करुन परतल्यानंतर आफ्रिकेच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. दक्षिण आफ्रिकेला निर्धारित षटकात ८ बाद ३०९ धावांपर्यंत मजल मारता आली.  बांगलादेशकडून मुस्तफिझूर रेहमानने सर्वाधिक ३ तर मोहम्मद शैफुद्दीनने दोन विकेट्स घेतल्या. शाकिब अल हसन आणि मेहंदी हसन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

'टेन्शन नॉट' सलामीच्या सामन्यासाठी कोहली 'फिट'

यष्टिरक्षक मुशफिकूर रहिम (७८) आणि शाकिब अल हसन (७५) यांची अर्धशतके आणि मोहम्मदुल्ल्हाने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बांग्लादेशने दक्षिण आफ्रिकेसमोर ३३१ धावांचे आव्हान ठेवले होते. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सलामीवीर तमीम इक्बाल आणि सौमया सरकारने बांगलादेशच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागेदारी करुन त्यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ही जोड गोळी संघाला आणखी मजबूत स्थितीत नेईल असे वाटत असताना फेलुकवायोने तमीमला क्विंटन डिकॉककरवी झेलबाद केले.

त्याने त्याने २९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर क्रिस मॉरिसने बांगलादेशला दुसरा धक्का दिला. त्याने अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या सरकारला ४२ धावांवर तंबूत धाडले. सौमया सरकारने आपल्या खेळीत ३० चेंडूचा सामना करताना ९ चौकार लगावले. सलामीवीर तंबूत परतल्यानंतर मुशफिकूर रहिम आणि शाकिब अल हसन यांनी १४२ धावांची भागीदारी करत संघाच्या डावाला आकार दिला. ही जोडी तंबूत परतल्यानंतर मैदानात उतरलेल्या मोहम्मदुल्ल्हाने ३३ चेंडूत तीन चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४४ धावांची नाबाद खेळी केली. त्याने तळाच्या फलंदाजांसोबत केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे बांगलादेशला निर्धारित ५० षटकात ५ बाद ३३० पर्यंत मजल मारली.

ICC WC 2019 : रबाडाचा कोहलीला शाब्दिक बाउन्सर!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 South Africa vs Bangladesh Phehlukwayo Tamim Soumya Sarkar de Kock Live Cricket Score Match 5 Result