पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्ल्ड कपसाठी दादासह या मंडळींची समालोचकांच्या यादीत वर्णी

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली

विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने आज (शुक्रवारी) समालोचकांची यांदी जाहीर केली. यात भारताच्या तिघांचा समावेश आहे. ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.  या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले हे आपल्याला समालोचन करताना दिसतील. याशिवाय नासिर हुसेन, इयान बिशॉप, मेलाने जॉन्स, कुमार संगकारा, मिचेल एथरेटॉन, अलीसन मिचेल, ब्रेडम मॅक्युलम, ग्रेहम स्मिथ आणि वासिम आक्रम यासारख्या दिग्गजांना समालोचकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. 

सर्व फलंदाज 'शून्य', अवांतरच्या रुपात मिळाल्या ४ धावा
 

यापूर्वी आयसीसीने आगामी विश्वषकासाठी १६ पंच आणि ६ मॅच रेफ्रींची नियुक्ती केली होती. यात भारताच्या एकमात्र पंचाचा समावेश करण्यात आला होता. एलिट पॅनेलमध्ये असणारे सुंदरम रवी यांना अनुभव आणि दर्जाच्या जोरावर विश्वचषकातील मैदानी पंचाच्या यादीत स्थान मिळाले होते.    

विश्वचषकात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम घडण्याचा संकेत
 

यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच ३६० डीग्री रिप्ले प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ज्यामुळे मैदानातील खेळातील विश्लेषण अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल. याशिवाय मैदानातील दृश्ये अगदी अचूकपणे टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर करण्यात येणार आहे.