पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोएबला क्रिकेट युद्धासारखे नव्हे प्रेमाने खेळायचंय!

शोएब मलिक

विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहणे एक वेगळीच अनुभूती असते. यंदाच्या स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार का? हा प्रश्नाच उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून भारताविरुद्धच्या सामन्याबद्दलच्या प्रतिक्रिया येणे सुरु झाले आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराजने विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात भारतीय संघ प्रतिस्पर्धी आहे, असे समजून मैदान उतरु असे म्हटले होते.

त्यानंतर आता पाकिस्तानचा अष्टपैलू आणि अनुभवी शोएब मलिकने भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 
भारताविरुद्धचा सामना हा इतर कोणत्याही सामन्याप्रमाणे सामान्यच असेल. मैदानावर रंगणाऱ्या सामन्यासंदर्भात युद्धासारख्या शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे. खेळाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रेमाची भावना जागृत करायला हवी शत्रूत्व नव्हे, असेही तो म्हणाला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शोएब  म्हणाला की, क्रिकेटमध्ये युद्ध या शब्दाचा वापर करायला बंदी घालायला हवी. क्रिकेट दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जर प्रेमाने प्रश्न सोडवले तर फार अडचणी निर्माण होत नाहीत. खेळामध्ये दोन देशातील संबंध सुधारण्याची ताकद आहे. एका देशाचे खेळाडू जेव्हा दुसऱ्या देशात खेळायला जातात तेव्हा दोन्ही देशातील गैरसमज दूर होतात.

आगामी विश्वचषकात १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नियोजित करण्यात आला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध खेळायचे किंवा नाही याबाबतचा निर्णय भारत सरकारवर अवलंबून असेल, असे स्पष्ट केले होते.