पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धवनशिवायही भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो: मायकल हसी

दुखापतीमुळे शिखर धवन भारतीय संघाबाहेर पडला आहे

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासून भारतीय संघाकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. संघाने आतापर्यंतच्या स्पर्धेतील कामगिरीने हा विश्वास खराही ठरवा आहे. भारतीय संघाच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही प्रभावित झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मायकल हसीने धवनच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो, असे म्हटले आहे. 

ICC WC 2019 : बीसीसीआयचा रिव्ह्यू फेल! धवन 'आउट' पंत 'इन'

शिखर धवन स्पर्धेतून आउट झाल्याने भारतीय संघाला कोणताही धोका नाही. भारतीय संघ हा क्षमतेने भरलेला असून धवनजी जागा घेण्यासाठी संघाकडे चांगले पर्याय उपलब्ध आहेत, असे मत ऑसीच्या मायकल हसीने व्यक्त केले आहे. विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात नॅथन कुल्टर नीलचा उसळत्या चेंडूवर  धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. १९ जूलैला बीसीसीआयने धवन स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट करत ऋषभ पंतला संघात स्थान दिले.  

बुमराहच्या यॉर्करवर विजय शंकर घायाळ, भारताला आणखी एक धक्का

मायकल हसीच्या मतानुसार, भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघात क्षमता असलेले पर्याय उपलब्ध असल्याचे दाखवून दिले आहे. शिखर धवनच्या जागी सलामीला आलेल्या लोकेश राहुलने रोहित शर्माला चांगली साथ दिली. या जोडगोळीने पाकिस्तान विरुद्ध वर्ल्डकपमधील विक्रमी भागीदारी रचली होती. स्पर्धेतील उर्वरित सामन्यात या जोडीकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 shikhar dhawans loss will not derail indias world cup campaign feels michael hussey