पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : बीसीसीआयचा रिव्ह्यू फेल! धवन 'आउट' पंत 'इन'

ऋषभ पंत आणि शिखर धवन

भारतीय संघाचा दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवन स्पर्धेतून आउट झाला आहे. त्याच्याऐवडी बॅकअप म्हणून बोलवलेल्या युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाचे मॅनेजर सुनील सुब्रमण्यम यांनी शिखर धवनने स्पर्धेतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. शिखर धवनच्या अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर असून यातून तो जुलैपर्यंत सावरु शकत नाही. त्यामुळे धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.  

ICC WC 2019 : टीम इंडियाचे 'कॅलक्युलेशन' गडबडण्याची भीती

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात नॅथल कुल्टर नीलचा एक उसळता चेंडू धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही त्याने शतकी खेळी करुन भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. धवनच्या दुखापतीनंतर पंतला धवनचा बदली खेळाडू म्हणून नाही तर बॅकअपसाठी बोलावल्याचे यापूर्वी बीसीसीआयने म्हटले होते. जर धवन दुखापतीतून सावरला नाही तर बीसीसीआय आयसीसीकडे पंतला संघात सहभागी करण्यासंदर्भातील निर्णय घेईल, असे ही यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज बीसीसीआयने पंतला संघात घेतल्याचे स्पष्ट केले. 

पंतला संघात स्थान मिळाल्यानंतर १५ सदस्यीय भारतीय संघात आता तीन यष्टिरक्षक झाले आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या उपस्थितीत दिनेश कार्तिकला फलंदाज म्हणून टीम इलेव्हनमध्ये संधी दिल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. त्याप्रमाणेच यंदाच्या विश्वचषकातील काही सामन्यात ऋषभ पंतला संधी दिली जावू शकते. धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने सलामीची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलली आहे. त्यामुळे पंतवर कर्णधार आणि टीम मॅनेजमेंट कोणत्या परिस्थितीत खेळवणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.