यष्टिमागे चपळता दाखवणारा महेंद्रसिंह धोनी यंदाच्या विश्वचषकात संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नने व्यक्त केले आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या टीकाकारांसाठीही वॉर्नने काही प्रश्न उपस्थित केले. धोनीच्या निवृत्तीच्या बाता करणारे धोनीला सर्वोत्तम पर्याय कोण हे सांगू शकतात का? असा सवाल वॉर्नने यावेळी उपस्थित केला.
World Cup : गड्यांनो विराटला एकटे पाडू नका, सचिनचा शिलेदारांना संदेश
वॉर्न म्हणाला की, "काही लोकांना विश्वचषकात भारतीय संघातील स्थान खटकते याचे आश्चर्य वाटते. एम एस धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा एक उत्कृष्ट सेवक आहे. भारतीय क्रिकेटला त्याने खूप काही दिले. निवृत्तीबाबत तो योग्यवेळी योग्य निर्णय घेईल" भारताचा माजी कर्णधार धोनीने यावर्षी खेळलेल्या ९ सामन्यात ८१.७५ च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत.
ICC World Cup: भारतीय संघ कोणाविरुद्ध कधी अन् कोणत्या मैदानात भिडणार!
आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नईचे नेतृत्व करतानाही धोनीने आपल्यातील क्षमता दाखवून दिली. आयपीएलमधील १५ सामन्यातील १२ डावात ८३.२० च्या सरासरीने त्याने ४१६ धावा केल्या आहेत. फलंदाजीशिवाय यष्टिमागील त्याचे योगदान संघासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. भारताचा कर्णधार विराटनेही धोनीचे संघातील स्थान महत्त्वपूर्ण असल्याचे यापूर्वी म्हटले होते.