पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही भारतालाही पराभूत करु शकतो : शाकिब अल हसन

शाकिब अल हसन

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीतील कमालीच्या कामगिरीनं शाकिब अल हसनने बांगलादेशला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयामुळे बांगलादेशच्या सेमीफायनलमधील आशा पल्लवित झाल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात अशीच कामगिरी करुन बांगलादेश पुन्हा संघ चमत्कारीक कामगिरी करण्यास उत्सुक आहे. 

साऊथहॅम्टनच्या मैदानात अफगाणिस्तानला ६२ धावांनी नमवत बांगलादेशने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. बांगलादेशसमोर उर्वरित दोन सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांचे आव्हान असणार आहे. २ जूलैला भारताविरुद्ध चांगली कामगिरी करु असा विश्वास शाकिबने व्यक्त केला आहे. शाकिब म्हणाला की, "भारतीय संघ स्पर्धेतील प्रमुख दावेदारापैकी एक आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान सोपे नाही. पण आम्ही ताकदिनीशी मैदानात उतरु, असा विश्वास शाकिबने व्यक्त केला. अनुभव निश्चितच  फायदेशीर ठरतो, पण प्रत्येकवेळी अनुभव भारी ठरतोच असे नाही. आमच्याकडे क्षमता आहे. भारताविरुद्ध चांगला खेळ करुन आम्ही त्यांना पराभूत करु, असा विश्वास शाकिबने व्यक्त केला आहे.  

 

अफगाणिस्तानला नमवत बांगलादेशची पाचव्या स्थानावर झेप

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ३२ वर्षीय शाकिबने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्याने आपल्या १० षटकांच्या कोट्यात २९ धावा खर्च करत ५ बळी टिपले. यंदाच्या विश्वचषकातील गोलंदाजीतील ही आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विश्वचषकात ५ बळी घेत ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा शाकिब दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात युवराज सिंगने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात असा पराक्रम केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Shakib warns India after record breaking performance against Afghanistan