पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : विराट ब्रिगेडसाठी सारा अलीचा खास संदेश 

सारा अली खान

 विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एक प्रेरणा गीत प्रदर्शित केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबतच्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सारा अलीने आपल्या इन्टाग्रावरुन हे गाणं आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत विश्वचषकातील सामन्यांसाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले आहे.  

भारताच्या सामन्यासाठी उत्सुक असलेल्या सारा अली खानने हा व्हिडिओ शेअर करताना खास कॅप्शन दिले आहे. यात तिने भारतीय संघाने विश्वचषक घेऊन  परतावे, अशी भावना व्यक्त केली आहे. भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड अव्वलस्थानी असून त्याच्यापाठोपाठ भारतीय संघाचा क्रमांक लागतो.

'टेन्शन नॉट' सलामीच्या सामन्यासाठी कोहली 'फिट'

यापूर्वी भारताने १९८३ आणि २०११ मध्ये विश्वचषक उंचावला आहे. यंदाच्या स्पर्धेत विराटने तिसऱ्यांदा भारताला विश्वचषक मिळवून द्यावा, अशीच साराप्रमाणे प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. ५ जूनला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात करेल. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघासोबत प्रत्येक संघ एक-एक सामना खेळणार आहे. १६ जूनला होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडेही सर्व चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 sara ali khan wants virat kohli team india to bring the trophy home watch video