पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक क्रिकेट संघाचे अभिनंदन केल्यामुळे सानिया मिर्झा पुन्हा ट्रोल

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक

ट्रेन्ट ब्रिज, नॉटींग्‍हॅमच्या मैदानात रंगलेल्या विश्वचषकातील सहाव्या सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. सलग अकरा पराभवानंतर संघाने कमबॅक केल्यानंतर पाकिस्तानी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून संघावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. काही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी देखील संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. यात भारताची टेनिस स्टार आणि शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिचा देखील समावेश आहे. 

पाकिस्तानच्या विजयानंतर सानिया मिर्झाने ट्विटच्या माध्यमातून पतीच्या संघाचे अभिनंदन केले. तिने ट्विटमध्ये लिहले आहे की, "जोरदार कमबॅक केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सामना रंगतदार झाला. विश्वचषक स्पर्धेतील रंगत आता अधिकाधिक वाढत आहे. तिच्या या  ट्विटवर अनेक समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या सामन्यात फलंदाजीमध्ये शोएब मलिकला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने संघाच्या धावसंख्येत केवळ ८ धावांची भर घातली होती. पण गोलंदाजीमध्ये त्याने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला तंबूचा रस्ता दाखवला होता. सानियाने केलेले हे ट्विट काहींना खटकले आहे. काहींनी तर तिला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचे समर्थन करणार असा प्रश्नही विटारला आहे. 

ICC WC 2019 : दोन शतकांवर तीन अर्धशतकं पडली भारी, पाकचा पहिला विजय

पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यानच्या ट्विटमुळे सानिया मिर्झा अनेकदा ट्रोल झाली आहे. यावेळीही तिला थोड्याफार प्रमाणात ट्रोल करण्यात आले. शोएब मलिकसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर तिने टेनिसमध्ये भारताकडूनच प्रतिनिधीत्व करणार अशी ठाम भूमिका घेतली असली तरी तिला नेहमी ट्रोलला सामोरे जावे लागते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 sania mirza trolled for giving congratulation to pakistan for victory against england in world cup