पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-पाक जाहिरात युद्धावर सानिया मिर्झा भडकली

सानिया मिर्झा

विश्वचषकात गुरुवारी भारत आणि न्यूझीलँड यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र सध्या क्रिकेट वर्तुळात रविवारी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन चर्चा रंगली आहे. दोन्ही राष्ट्रांतील जाहिराती खेळाच्या मैदानातील वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. 
सोशल मीडियावर जाहिरातीच्या व्हिडिओच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान यांच्यातील चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.

सोशल मीडियावर सुरु असलेल्या या प्रकारावर भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या ट्विटर अकाउंटवरु दोन्ही राष्ट्रांच्या चाहत्यांसाठी संदेश देताना भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली आहे.
दोन्ही राष्ट्रांमध्ये तिरस्कार पसरवणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. दोन्ही देशांतील चाहत्यांना सामन्याबद्दल उत्सुकता आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या जाहिरातींची आवश्यकता नाही. हा मूर्खपणाचा कळस आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात केवळ क्रिकेटचा सामना होत आहे, अशा आशयाचे ट्विट करत सानियाने भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवर टीका केली. 

ICC WC 2019 : #IndvsPak वर्ल्ड कपमधील 'फाइट'पूर्वी वातावरण 'टाइट'

सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यापूर्वी तिने आपला पती शोएब मलिक प्रतिनिधीत्व करत असलेल्या पाकिस्तानी संघाच्या पहिल्या विजयानंतर अभिनंदन करणारे ट्विट केले होते. यावेळी तिला काही नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात तू कोणाला पाठिंबा देणार? असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी तिला विचारला होता.