पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटच्या नेतृत्वावर रोहितची 'मन की बात'

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli, Rohit Sharma)

भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या नेतृत्वाबद्दल आपल्या मनातील गोष्ट सांगितली आहे. भारतीय संघाच्या उप-कर्णधार या नात्याने माझ्यावरही खूप मोठी जबाबदारी आहे, असे रोहितने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. संघ कठीण परिस्थितीत असताना कर्णधार विराट कोहलीला योग्य ती मदत करतो, असेही त्याने म्हटले आहे. 

रोहित म्हणाला की, उप-कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळताना प्रत्येक सामन्यात कर्णधाराच्या सोबत असणे ही माझी जबाबदारी आहे. जेव्हा संघ कठीण परिस्थितीत असतो तेव्हा मी कर्णधार विराटसोबत योग्य ती चर्चा करतो. २०१७ पासून रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. आपल्या वरिष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय संघात योगदान देत असल्याचे सांगताना त्याने सचिन आणि सेहवाग या दिग्गजांचा किस्साही शेअर केला. जेव्हा धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता तेव्हा सचिन, सेहवाग आणि हरभजन सिंग हे वरिष्ठ खेळाडू त्याला मदत करायचे. त्याच्यांप्रमाणेच मी देखील सध्याच्या घडीला कर्णधाराला योग्य ती मदत करण्यावर भर देतो, असे तो म्हणाला.  

संघाच्या ताकदीबद्दल रोहित म्हणाला की, संघाची कामगिरी ही एक-दोन खेळाडूंवर नाही तर संपूर्ण संघावर अवलंबून असते. कर्णधार विराट कोहली सर्वांच्या मतांचा आदर राखतो. त्यामुळे संघ एकजूट आहे, असेही त्याने सांगितले. ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताच्या १५ सदस्यीय संघातील रोहित शर्मा हा प्रमुख खेळाडू आहे. शिखर धवनसह भारताच्या डावाला चांगली सुरुवात करुन देण्याची मुख्य धूरा त्याच्यावर असेल. ५ जूनला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने स्पर्धेला सुरुवात करेल.