पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvBAN रोहित-लोकेश राहुल जोडीचा विक्रम!

लोकश राहुल आणि रोहित शर्मा

बर्मिंगहॅमच्या मैदाना भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने विश्वचषकातील आतापर्यंतची विक्रमी भागीदारी रचली. प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतल्यानंतर या जोडीने पहिल्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी रचली. आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोच्च कामगिरी आहे. 

Video : #INDvBAN हिटमॅनच्या शतकानंतर आजीबाईंच सेलिब्रेशन

यापूर्वी २०१५ च्या विश्वचषकात रोहितने धवनच्या साथीने १७४ धावांची भागीदारी रचली होती. १९९६ च्या विश्वचषकात अजय जडेजा आणि सचिन तेंडुलकरने केनियाविरुद्ध १६३ धावांची सलामी दिली होती. तर २००३ च्या विश्वचषकात सचिन-सेहवाग जोडीने श्रीलंकेविरुद्ध १५३ धावांची भागीदारी केली होती. 

ICC WC #INDvBAN : रोहितला संधी म्हणजे शतकाची नांदी!

रोहित शर्माने या सामन्यात चौथे शतक झळकावले. तर लोकेश राहुलने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय डावाला भक्कम सुरुवात करुन दिली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 rohit sharma and kl rahul partnership Highest opening PartnerShip for India in World Cup