पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : 'जर-तर' समीकरणातून पंतच इंग्लंडला जाणार हे ठरलं

ऋषभ पंत आणि शिखर धवन

भारतीय संघाचा दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनचा बॅकअप म्हणून बीसीसीआयने युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतला पसंती दिली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. बीसीसीआयने अद्याप धवनच्या जागी बदली खेळाडूच्या निवडीबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी बॅकअप म्हणून त्यांनी ऋषभ पंतला इंग्लंडला बोलवले आहे. जर धवन दुखापतीतून सावरला नाही तर पंतची संघात वर्णी लागणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. 

ICC WC 2019 : शिखर धवन संघासोबत राहणार, BCCI चे स्पष्टीकरण

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पंतला धवनचा बदली खेळाडू म्हणून नाही तर बॅकअपसाठी बोलावण्यात आले आहे. जर धवन दुखापतीतून सावरला नाही तर बीसीसीआय आयसीसीकडे पंतला संघात सहभागी करण्यासंदर्भातील निर्णय घेईल, असे ही त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात नॅथल कुल्टर नीलचा एक उसळता चेंडू धवनच्या हाताच्या अंगठ्याला लागला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. धवनच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. यात ऋषभ पंतचे नाव आघाडीवर होते.

ICC WC 2019 : पंतला प्लेनमध्ये बसवा, पीटरसनचा भारतीय संघाला सल्ला

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या १५ सदस्यीय संघात युवा ऋषभ पंतची वर्णी न लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. निवड समितीने त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली होती. राखीव खेळाडू म्हणून फंलदाजीमध्ये बीसीसीआयने ऋषभ पंत आणि अंबाती रायडू यांची निवड केली होती.