पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvNZ Semi: जडेजाने ड्रेसिंगरुमचा माहोल बदलला, पण...

जडेजाने ड्रेसिंगरुमचे वातावरण बदलले

मँचेस्टरच्या मैदानात आघाडी कोलमडल्यानंतर अष्टपैलू जडेजाने हातून निसटलेल्या सामना पुन्हा भारताच्या बाजूने आणला आहे. पंत आणि हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये शांतता पसरली होती. आतापर्यंत दमदार कामगिरी केलेला सलामीवीर रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहलीसह सर्व संघ सहकाऱ्यांचा चेहरा पडला होता. 

ड्रेसिंगरुमसारखीच काहीशी अवस्था क्रिकेट चाहत्यांचीही झाली होती. पण सर रविंद्र जडेजाने विश्वासक खेळीने भारतीय संघाच्या आशा पल्लवित केल्या. त्याने आक्रमक खेळीने भारताला सामन्यात परत आणले. त्याच्या खेळीनंतर भारतीय ड्रेसिंगरुमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.   

जोपर्यंत जडेजा मैदानात होता तोपर्यंत भारतीय संघाला फायनलचे तिकीट मिळेल असे वाटत होते. पण तो ७७ धावांवर बाद झाल्यानंतर भारताच्या हातून सामना पुन्हा निसटला. बोल्टने त्याची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.