पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : रविंद्र जडेजाचा 'लाजवाब' झेल

रविंद्र जडेजा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या रविंद्र जडेजाने अफलातून क्षेत्ररक्षण करत इंग्लंडला पहिला धक्का देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी दीडशतकी भागीदारी रचत स्पर्धेतील भारताविरुद्धची आतापर्यंतची सर्वोत्कष्ट भागीदारीची नोंद केली.  

दुखापतीतून परतलेला जेसन रॉय आणि जॉनी  बेअरस्टो यांची जोडी डोकेदुखी ठरत असताना कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने  ५७ चेंडूत ६६ धावांची खेळी करणाऱ्या जेसन रॉयला माघारी धाडले.कुलदीप यादवने आपल्या पाचव्या षटकाच्या सुरुवातीला जेसन रॉयला जाळ्यात अडकवले. त्याने टाकलेला चेंडू सीमारेषेलीकडे टोलवण्याच्या नादात जेसन रॉय झेलबाद झाला.

रॉयला जीवनदान, धोनी रिव्ह्यू सिस्टिम फेल!

जडेजाने क्षेत्ररक्षणातील सर्वोच्च कामगिरी दाखवून देत  हेवतच चेंडू पकडत रॉयच्या खेळीला पूर्णविराम लावला. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जडेजाने रॉयशिवाय जडेजाने तुफान फटकेबाजी करणाऱ्या बेन स्टोक्सचाही बुमराहच्या गोलंदाजीवर एक सोपा झेल पकडला.