पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

World Cup : 'डोन्ट व्हरी... आम्ही कमबॅक करु'

रविंद्र जडेजा

इंग्लंड आणि वेस्लमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील सराव सामन्यातील ढिसाळ कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांची अष्टपैलू रविंद्र जडेजाने पाठराखण केली आहे. सराव सामन्यातील फलंदाजांची कामगिरी हा चिंतेचा विषय नाही. आगामी सामन्यात आम्ही चुकांची भरपाई करु, असे त्याने म्हटले आहे. 

न्यूझीलँडविरुद्धच्या सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघ ३९.२ षटकात १७९ धावात आटोपला होता. सलामवीरांनी नांगी टाकल्यानंतर कर्णधार विराट कोहली देखील संघाला सावरण्यात अपयशी ठरला होता. स्पर्धेतील प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघातील फलंदाज न्यूझीलँडच्या गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरले. या कामगिरीमुळे आगामी सामन्यात भारतावर दबाव निर्माण होईल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे.  

World Cup: धोक्याची घंटा; सराव सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव

यावर जडेजा म्हणाला की, "हा आमचा पहिला सामना होता. आपण खेळाडूंना एका डावामध्ये जज करु शकत नाही. हा आमच्यासाठी निराशजन क्षण होता. परंतु आगामी सामन्यात फलंदाजी डोकेदुखी ठरणार नाही. इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतच असतात. जेव्हा तुम्ही भारतातून येऊन इथे खेळता त्यावेळी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागले. आमच्याकडे अजूनही वेळ आहे. त्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज वाटत नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळू" यावेळी त्याने विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही म्हटले आहे.   

Video : यष्टिमागचा जादूगर धोनी जेव्हा सीमारेषेवर फिल्डिंग करतो

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याच्या निर्णयाबद्दल जेडेजा म्हणाला की, "खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल आहे हे आम्हाला माहिती होते. त्यामुळेच आम्ही फलंदाजी करणे निवडले. विश्वचषकातील मुख्य सामन्यात खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी ते आम्हाला फायदेशीर ठरेल. आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करुन दाखवू यात काहीच शंका नाही." न्यूझीलँड विरुद्धच्या सराव सामन्यात जडेजाने ५० चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होता. यात ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.