पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

World Cup : द्रविड म्हणतो, हे त्रिकुट भारतासाठी 'लक फॅक्टर' ठरेल

राहुल द्रविड

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या घडीला भारत 'अ' संघाच्या प्रशिक्षकपदी असणाऱ्या द्रविडने आगामी विश्वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सपाट खेळपट्टीवर गोलंदाजांची मुख्य भूमिका असेल, असेही द्रविडने म्हटले आहे. 

भारतीय गोलंदाजांच्या क्षमतेबद्दलही त्याने यावेळी विश्वास व्यक्त केला. सध्याच्या घडीला भारतीय संघात चांगले गोलंदाज आहेत. ते मध्यक्रमात विकेट घेण्यात सक्षम आहेत.  इंग्लंडमधील खेळपट्टीविषयी द्रविड म्हणाला की,  'मी मागील वर्षी भारत अ संघासोबत इंग्लंड दौरा केला आहे. माझ्या अनुभवानुसार या खेळपट्टीवर आपल्याला मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. सर्वाधिक धावा होणाऱ्या सामन्यामध्ये तुमच्याकडे मध्य षटकात विकेट घेणारे गोलंदाज असावे लागतात. भारतीय संघ याबाबत नशीबवान आहे. 

जर धोनी असेल तर मी पुढचा वर्ल्ड कप खेळेन : एबी

तो पुढे म्हणाला, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल मध्यफळीत विकेट्स घेण्याची क्षमता असणारे गोलंदाज आहेत. सर्वाधिक धावसंख्या होणाऱ्या सामन्यात मध्यांतरातील षटके महत्त्वपूर्ण असतात. यावेळी विकेट मिळवणारा संघ प्रतिस्पर्धीला कमीत कमी धावांवर रोखण्याची संधी निर्माण होईल.' भारत विश्वचषकातील प्रमुख दावेदार असणाऱ्या संघापैकी एक आहे. सर्वांना भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे.