पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्ल्ड कपसह मनंही जिंका, मोदींचा विराट ब्रिगेडला संदेश

पंतप्रधान मोदींनी दिल्या टिम इंडियाला शुभेच्छा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेतेला सुरुवात करणाऱ्या टिम इंडियाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरल्यानंतर मोदींच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून खेळासह मनं ही जिंका, अशा शब्दांत मोदींनी संघाला विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या आहेत.

३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु झालेल्या  विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकविरुद्ध आपला पहिला सामना खेळत आहे. या स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखालील संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने चांगली सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला धक्के देत बॅकफूटवर ठेवले आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ विजयी सलामी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ICC WC 2019 : मैदानात पाऊल ठेवताच केदारच्या नावे 'या' विक्रमाची नोंद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 pm narendra modi best wishes to the entire Team India for world cup tournament