पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पाक चाहत्याने सरफराजला चारचौघात 'बेअब्रू' केलं

सरफराज अहमद

विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सातव्यांदा पराभूत झाल्यानंतर पाकिस्नानी संघ आणि कर्णधार सरफराज अहमद यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. विश्वचषक स्पर्धेत रंगलेल्या हाय होल्टेज सामन्यात भारताने पाकला डकवर्थ लुईस नियमावलीनुसार ८९ धावांनी पराभूत कले होते. हा पराभव पाकच्या क्रिकेट चाहत्यांच्या अजूनही पचनी पडलेला नाही.  

भारत-पाक सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाक संघातील खेळाडूंवरील  टीकेचा  एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर आता कर्णधार सरफराज अहमदला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान चाहत्याने भर गर्दीच्या ठिकाणीच पाक कर्णधाराला आक्षेपार्ह शब्दांत सुनावल्याचे पाहायला मिळते. 

#IndvsPak : सरफराजवर अंतर्गत मतभेदासंदर्भातील प्रश्नांचा मारा

सरफराज आपल्या मुलासह मॉलमध्ये जात असताना पाकच्या एका क्रिकेट चाहत्याने त्याची वाट अडवली. काही क्षणासाठी सरफराजला वाटले त्या व्यक्तीला आपल्यासोबत सेल्फी घ्यायची आहे. मात्र, चाहत्याने फिटनेसवरुन सरफराजला खालच्या पातळीत टिपण्णी केली.  'भाई, आप सुअर जैसे मोटे क्यों होते जा रहे हो।' असा प्रश्न त्याने केला.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही नेटकऱ्यांनी चाहत्याचे वर्तन लजास्पद असल्याचे म्हटले आहे. 

#IndvsPak : पाकविरुद्धच्या विक्रमी विजयामागची पाच प्रमुख कारणे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 pakistani fan who body shamed sarfaraz ahmed inside a mall gets trolled ahead of icc cricket world cup 2019 clash vs south africa