पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॅच फिक्सिंगशिवाय पाकचा विजय मुश्किल, आमीरची वादग्रस्त टिप्पणी

पाकिस्तानी संघ

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडाली होती. त्यानंतर आता मॅच फिक्सिंगच्या मुद्यावरुन पाकिस्तानी संघ पुन्हा चर्चेत आला आहे. पाकिस्तानी वंशाचा आणि इंग्लंडचा बॉक्सर असलेल्या आमीर खानने एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानी संघ हा मॅच फिक्सिंग शिवाय जिंकू शकत नाही, असे वादग्रस्त विधान केले आहे.

एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तानची बाजू मांडताना त्याने विनोदी अंदाजात पाकिस्तानला मॅच फिक्सिंगशिवाय जिंकणे मुश्किल असल्याचे म्हटले.  त्यानंतर नेटकऱ्यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. या कार्यक्रमामध्ये आमीरला पाकिस्तानने जिंकण्यासाठी काय गेम प्लॅन ठरवला पाहिजे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर संघ मॅच फिक्सिंग कशी मॅनेज करेल यावर ते अवलंबू असल्याचे उत्तर त्याने दिले.

ICC WC 2019: भारत-श्रीलंका-पाकला जमलं नाही ते बांगलादेशनं करुन दाखवलं

विश्वचषक स्पर्धेतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी संघ चांगलाच ट्रोल झाला होता. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संघाने चांगले कमबॅक केले. वेस्ट इंडिज नांगी टाकलेल्या पाकची फलंदाजी यजमान इंग्लंडविरुद्ध बहरल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार सरफराजसह तिंघाच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ३४८ धावांपर्यंत मजल मारली.