पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#PAKvSA पाकने 'करो वा मरो'ची लढत जिंकली

पाकची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मोहिम फत्ते

लंडन येथील लॉर्डसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत करत पाकिस्तानने गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकने दिलेल्या ३०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित ५० षटकात ९ बाद २५९ धावांपर्यंत मजल मारता आली.

हाशिम आमला आणि क्विंटन डि कॉक या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच षटकात हाफीजच्या षटकात वहाबने क्विंटन डी कॉकला झेलबाद करण्याची संधी दवडली. पण मोहम्मद आमिरने  षटकात आमिरने सलामीवीर हाशिम आमलाला अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. शदाब खानने ४७ धावांवर खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला इमाम हुल हक करवी झेलबाद करत आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. कर्णधार फाफ डुप्लेसीने एका बाजूने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. शदाबा खानने मार्करमला अवघ्या ७ धावांवर माघारी धाडले.

जिथं पाकचा 'फ्लॉप शो', तिथं भारताचा 'रॉक शो'

त्यानंतर आमिरने कर्णधार फाफ ड्युप्लेसीला सरफराज करवी झेलबाद केले. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक ६३ धावा केल्या. रॅसी व्हॅन डेर ड्यूसन (३६), डेव्हिड मिलर (३१), क्रिस मॉरिस (१६) धावा करुन बाद झाल्यानंतर फेहलुकवायोने ४६ धावा करत शेवटपर्यंत नाबाद राहिला. पाकिस्तानकडून  शदाब खान आमि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद आमिरने दोन आणि शाहिन आफ्रिदिने एक गडी बाद केला.

'करो वा मरो' या परिस्थितीत मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून सरफराज खानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर इमाम-उल-हक (४४) फखर झमान (४४) धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर बाबर आझमने ८० चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ६९ धावा आणि शोएब मलिकच्या जागेवर संघात संधी मिळालेल्या हॅरिस सोहेलच्या ५९ चेंडूतील ८९ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानला निर्धारित ५० षटकात ७ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद हाफिज (२०) आणि इमाद वासिम (२३) धावांचे योगदान दिले. कर्णधार सरफराज २ तर शदाब खान एक धाव करुन नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक तीन तर इमरान ताहिरने दोन बळी मिळवले. फेहलुकवायो आणि मार्करम यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेत या जोडीला मदत केली.

#PAKvSA क्रिकेटच्या पंढरीत इम्रान ताहीरची विक्रमाला गवसणी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Pakistan vs South Africa Match 30 Cricket Score Final Result Lords London