पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#PAKvsBAN आम्ही ५०० धावा करु, काहीही हं सरफराज!

पाकसमोर उपांत्य फेरीच गणित 'मुश्किल'च

क्रिकेटच्या पढंरीत म्हणजेच लॉर्डसच्या मैदानात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आज साखळी फेरीतील शेवटचा सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी जवळपास शेवटचा सामना असेल. यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत  गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघापाठोपाठ तिसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. सध्याच्या घडीला रनरेटच्या जोरावर ११ गुणांसह न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. 

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या नावे अनुक्रमे ९ आणि आणि ८ गुणासह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ते ११ गुणासह न्यूझीलंडची बरोबरी करु शकतात. मात्र, उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी त्यांना मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागणार आहे. 

गेल्या काही सामन्यांपासून पाकिस्तानी संघ १९९२ मध्ये इमरानच्या नेतृत्वातील संघाने केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती करेल, का? अशी चर्चा रंगली होती. पण आता ही पुनरावृत्ती करणे पाकिस्तानसाठी फारच अवघड आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने जर ३५० धावा केल्या तर त्यांना हा सामना ३११ धावांनी जिंकावा लागेल. किंवा ४०० धावा उभारुन त्यांना बांगलादेशला ३१६ धावांनी पराभूत कराले लागेल. 

जर-तर मध्ये फसला पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हा आहे मार्ग

सामन्यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदने आम्ही ५०० धावा उभारु असा विश्वास व्यक्त केला आहे. पाकिस्तानला हे जमणार का? हा मोठा प्रश्नच आहे. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वे विरुद्ध १ बाद ३९९ धावांची सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती. या सामन्यात फखर झमानने १५६ चेंडूत २१० धावा, इमाम उल हकने १२२ चेंडूत ११३ धावा तर असिफ अलीने २२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. पाकिस्तानने झिम्बाब्वेला १५५ धावांत रोखत २४४ धावांनी जिंकला होता. या जोरावरच सरफराज अहमदने आम्ही ५०० धावा करु म्हटला असला तरी  बांगलादेश म्हणजे झिम्बाब्वे नाही हे कोणालाही सहज मान्य होईल. त्यामुळे हे गणित पाकिस्तानला सुटेल असे वाटत नाही.  

शमी ठरला भारी! वर्ल्ड कपमधील ११ सामन्यात ३१ बळी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Pakistan vs Bangladesh Match 43 Semifinal qualification scenario for Pakistan looks bleak