पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: कर्णधारांची महाराणी ऐलिझाबेथ यांच्यासोबत 'ग्रेट-भेट'

 इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्णधारांची भेट घेतली

ICC World Cup 2019 Opening Ceremony: आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी काल (बुधवारी) स्पर्धेचा  उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बर्मिंघम पॅलस जवळील लंडन मॉलमध्ये राजेशाही थाटात रंगलेल्या सोहळ्यात इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्णधारांची भेट घेतली.  

या कार्यक्रमात विराट कोहलीने भारतीय संघाचे समर्थन करणाऱ्या इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत सहभाग  आनंददायी आहे. याठिकाणी भारतीय संघाला चांगले समर्थन करणारे चाहते आहेत. त्यामुळे दबाव आणि अभिमान अशा फिलिंग्स असल्याचे तो म्हणाला. आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे त्यांने यावेळी सांगितले.  

ICC WC 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमधून आपला सचिन नवी इनिंग सुरु करतोय!

या कार्यक्रमात प्रत्येक देशाच्या दोन खास पाहुण्यांना बोलवण्यात आले होते. यात भारताचे माजी प्रशिक्षक आणि फिरकीपटू अनिल कुंबळे आणि फरहान अख्तर यांचा समावेश होता. पाकिस्तानकडून मलाला युसूफजई आणि अजहर, वेस्टइंडिजकडून विवियन रिचडर्स आणि धावपटू योहान ब्लॅक, दक्षिण अफ्रीकाचे चॅक कॅलिस, ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट ली, आणि इंग्लंडकडून कविन पीटरसन यांनी हजेरी लावली होती.  

WC 2019: विराट वर्ल्डकप जिंकून देईल, कपिल पाजींना विश्वास

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 opening ceremony all team captains meet the queen elizabeth as opening party concludes