पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 यजमान इंग्लंडवर टांगती तलवार!

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाने इंग्लंड बॅकफूटवर

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून इंग्लंडचा संघ पिछाडीवर पडला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असणारा आणि यंदाच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या  इंग्लंडचा पुढील प्रवास खडतर झाला आहे. 

विश्वचषकामधील ६ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणासह इंग्लंड गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. उर्वरित तीन सामन्यात त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड, दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाचे आव्हान परतवून लावायचे आहे. तगडे प्रतिस्पर्धकांचे आव्हान परतवण्यात गफलत झाली तर उपांत्यफेरीतील त्यांचे गणित बिघडू शकते.  

ICC WC #INDvAFG : पंचांशी हुज्जत घालणं कोहलीला पडलं महागात

साखळी फेरीतील तीन पैकी दोन सामने त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत. श्रीलंकाविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार इयॉन मॉर्गनने आपल्या संघ पुन्हा तोऱ्यात कमबॅक करण्यास सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यानंतर त्यांच्यासमोर भारत आणि न्यूझीलंड यांचे आव्हान असेल.

#PAKvSA क्रिकेटच्या पंढरीत इम्रान ताहीरची विक्रमाला गवसणी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 once favorite of world cup title england cricket team faces tough challenge to make for playoffs